शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी श्रमदानातून उपसला सार्वजनिक विहिरीतील गाळ

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आसरअल्ली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीच केली विहिरींची स्वच्छता आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेउन श्रमदानातून बोरगुड्डम वार्डातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छता केली.अत्यल्प पावसामुळे यंदा सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, झिंगानूर परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी शेकडो विहिरी आत्ताच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाल्यातून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आसरअल्ली गावातही उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आसरअल्ली येथील बोरगुड्डम वार्डातील महसूल विभागाच्या इमारतीजवळची ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षांपासून बुजली होती. या संदर्भात वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या व या विहिरींतील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वार्डातीलच महिला, पुरूष व मुलांनी एकत्र येऊन श्रमदानातून विहिरीतील गाळ उपसण्याचे काम केले. चार दिवस सदर काम केल्यावर या विहिरीला पाणी लागले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची सुविधा झाली आहे. (वार्ताहर)आठवडाभरापासून वीजबत्ती गूल; नळ पाणी पुरवठा ठप्पअवकाळी वादळी पावसामुळे आसरअल्ली भागातील वीज खांब वाकले तसेच काही ठिकाणच्या तारा लोंबकळत आहेत. परिणामी आसरअल्ली येथील वीज पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.बोरगुडम वार्डात पाणी टंचाई तीव्र होणारआसरअल्ली गावातील बोरगुडम येथील नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन श्रमदानातून सार्वजनिक विहिरींची गाळ उपसा करून स्वच्छता केली. त्यामुळे या विहिरीला काही प्रमाणात पाणी लागले आहे. मात्र ग्रामपंचायत या विहिरींचे खोलीकरण न केल्यास १५ दिवसानंतर पुन्हा या वार्डात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.