शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ११५ गर्भवती मातांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST

गडचिराेली जिल्हा मुख्यालयी जिल्हा महिला व बालरुग्णालय आहे. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर ९ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. ग्रामीण ...

गडचिराेली जिल्हा मुख्यालयी जिल्हा महिला व बालरुग्णालय आहे. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर ९ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. ग्रामीण भागात जवळपास ४५ प्राथमिक आराेग्य केंद्रे असून, ३०० पेक्षा अधिक उपकेंद्रे आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागात आराेग्य पथकेही आहेत. या सर्व ठिकाणी गर्भवती मातांची प्रसूती केली जाते. मात्र सीझर प्रसूतीची व्यवस्था जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातच आहे. त्यामुळे येथे रेफर हाेणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या अधिक असते.

मार्च २०२० अखेरीपासून काेराेना महामारीचे संकट जिल्ह्यात निर्माण झाले. दरम्यान, आराेग्य यंत्रणेला घडीभरचीही उसंत मिळाली नाही. काेराेना संसर्गाला थांबविण्यासाेबतच गर्भवती माता व नवजात बालकांच्या आराेग्याची परिपूर्ण काळजी घेण्यात आली.

काेट .......

जिल्ह्यातील काेणत्याही गर्भवती मातेला काेराेनाचा संसर्ग झाला किंवा तशा प्रकारची लक्षणे आढळली, तर महिलांनी घाबरून जाऊ नये, नजीकच्या रुग्णालयात या मातांवर संपूर्ण उपचार करण्यासाठी आम्ही बांधील आहाेत. कुठल्याही गराेदर मातेला प्रसूतीसाठी त्रास हाेणार नाही, याची परिपूर्ण काळजी संबंधित रुग्णालयात घेतली जाते, तसेच आढळून आलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह गराेदर मातांची प्रसूती सुखरूप करण्यात आली आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.

- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी, गडचिराेली.

बाॅक्स .....

केवळ दाेन महिलांचा गर्भपात

गराेदरपणा व प्रसूती या बाबी महिलांसाठी अतिशय गंभीर आहेत. या काळात आराेग्याची परिपूर्ण व प्रचंड काळजी घ्यावी लागते. काेराेनाच्या काळात पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या दाेन गर्भवती महिलांचा गर्भपात झाला. या दाेन्ही महिला ग्रामीण भागातील असल्याची माहिती मिळाली आहे.

बाॅक्स ...

सीझर प्रसूतीचे प्रमाण वाढले

महिलांची जीवनशैली बदलली आहे. शिवाय अनेक महिलांचे जीवन दगदगीचे व धावपळीचे झाले आहे. अशावेळी आराेग्याची परिपूर्ण काळजी घेण्याकडे महिलांचे दुर्लक्ष हाेते. काेराेनाच्या काळात गेल्या वर्षभरात गर्भवती मातांच्या सीझर प्रसूतीचे प्रमाण वाढले. मात्र, प्रसूतीदरम्यान माता व बालकाला धाेका पाेहाेचला नाही.