शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

चारपैकी एकच पॅसेंजर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज रेल्वे स्थानकावरून काेराेनापूर्वी चार पॅसेंजर धावत हाेत्या. आता मात्र केवळ एकच पॅसेंजर धावत आहे, तसेच काही एक्स्प्रेस गाड्यांचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत. देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत. सध्या गाेंदिया-बल्लारशहा ही पॅसेंजर सकाळी १० वाजता गाेंदियावरून बल्लारशहाकडे जाते व सायंकाळी ५.३४ वाजता गाेंदियाकडे जाते. याच मार्गाने चालणाऱ्या उर्वरित तीन पॅसेंजर बंद आहेत. मागील एक महिन्यापासून एसटीचाही संप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे. एकच पॅसेंजर असल्याने या पॅसेंजरमध्ये माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी राहते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

प्रवाशांच्या खिशाला झळ

काेराेनाच्या कालावधीत शासनाने रेल्वेसेवा बंद ठेवली हाेती. आता मात्र, काेराेनाचे रुग्ण कमी झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील काम पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, शासनाने अनेक पॅसेंजर बंदच ठेवल्या आहेत. पॅसेंजर बंद असण्याबराेबरच एसटीचा संपही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.                  - शरद मेश्राम, नागरिक

दरभंगा, यशवंतपूर-काेरबा एक्स्प्रेसचा थांबा रद्ददेसाईगंज रेल्वे मार्गाने दिवसभरातून अनेक एक्स्प्रेस धावतात. त्यापैकी यशवंतपूर-काेरबा, बिलासपूर-चेन्नई व दरभंगा या तीन एक्स्प्रेसचे काेराेनापूर्वी देसाईगंज येथे थांबे हाेते. आता मात्र, यशवंतपूर-काेरबा, दरभंगा या दाेन एक्स्प्रेसचा देसाईगंज येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. केवळ बिलासपूर-चेन्नई या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. बिलासपूरवरून चेन्नईकडे जाणारी एक्सप्रेस दुपारी ३ वाजता देसाईगंजात पाेहाेचते, तर चेन्नईवरून बिलासपूरला जाणारी एक्स्प्रेस रात्री ७.४० वाजता देसाईगंज येथे पाेहाेचते.

 

टॅग्स :railwayरेल्वे