शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू

By admin | Updated: July 1, 2015 01:53 IST

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा नवजात बालक दगावला, ...

जिल्हा रुग्णालयातील प्रकार : पोलीस ठाणे, एसपीकडे तक्रारगडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा नवजात बालक दगावला, यासंदर्भात प्रसूत महिलेचे पती दिनेश मंडल व नातेवाईकांनी गडचिरोली पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून येथील दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय मानवाधिकार परिषद गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष गजेंद्र डोमळे, महिलेचे पती दिनेश मंडल व महिलेच्या नातेवाईकांनी केली.यावेळी माहिती देताना पती दिनेश मंडल, प्रसूत महिलेचा भाऊ असिम समजदार, वहिणी शोभा समजदार यांनी सांगितले की, चामोर्शी तालुक्यातील रवींद्रपूर येथील शांती दिनेश मंडल (३०) या गरोदर मातेला ३० जून २०१५ रोजी प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ७ जूनला प्रसुती न करता शांती मंडल हिला सुटी देण्यात आली. १५ दिवसानंतर प्रसुतीकरिता सदर महिलेला आणण्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर २४ जून रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्रॉफी काढण्यात आली. मात्र येथील डॉक्टरांनी सदर महिलेची वेळेवर प्रसुती केली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजता नवजात बालकाचा गुदमरून गर्भातच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता प्रसुती तज्ज्ञ डॉ. किलनाके यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मृतावस्थेतच बालक गर्भाशयातून बाहेर काढण्यात आला, असेही दिनेश मंडल यांनी सांगितले. याप्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.