बार असाेसिएशनची नवीन कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST2021-03-05T04:36:38+5:302021-03-05T04:36:38+5:30

गडचिराेली : गडचिराेली जिल्हा बार असाेसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. रवींद्र दाेनाडकर व सचिवपदी ॲड. नितेश ...

New executive of the Bar Association formed | बार असाेसिएशनची नवीन कार्यकारिणी गठित

बार असाेसिएशनची नवीन कार्यकारिणी गठित

गडचिराेली : गडचिराेली जिल्हा बार असाेसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. रवींद्र दाेनाडकर व सचिवपदी ॲड. नितेश लाेडल्लीवार हे निवडून आले आहेत.

उपाध्यक्षपदी ॲड. अनिल चाैधरी, सहसचिव ॲड. कांचन म्हशाखेत्री, काेषाध्यक्ष ॲड. प्रमाेद ब्राह्मणवाडे, ग्रंथपाल ॲड. राेशन टेंभुर्णे, कार्यकारी सदस्य म्हणून ॲड. सचिन कुंभारे, ॲड. सतीश बारसिंगे, ॲड. मृणाल मेश्राम, ॲड. राहुल गावडे, ॲड. स्नेहा मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

काेराेनामुळे गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. अशाही स्थितीत पुढील दिवसांत न्यायालयीन कामकाजात सामान्य नागरिकांना कमी त्रास हाेईल, यासाठी हे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील.

Web Title: New executive of the Bar Association formed