शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

युवकासोबत गेलेल्या महिलेची जंगलात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३  रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड येथीलच त्या युवकाला ताब्यात घेऊन बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळा दाबून त्या महिलेला जिवे मारल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील कुरूड येथून १० दिवसांपूर्वी, म्हणजे गेल्या २ ऑक्टोबरला गायब झालेल्या एका ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह मोहटोला-शिरपूरच्या जंगलात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. रोहिणी उदाराम दोनाडकर (३६ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला कुरूड येथील कुंदन अशोक ठाकरे (२४ वर्षे) या युवकासोबत मोटारसायकलवर बसून गेली होती. त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३  रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड येथीलच त्या युवकाला ताब्यात घेऊन बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळा दाबून त्या महिलेला जिवे मारल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार, घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे काहीच आढळले नाही. त्यामुळे तो युवक दिशाभूल करीत असल्याचे वाटून पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. 

साडीवरून पटविली पत्नीची ओळखघटनेच्या १० दिवसांनंतर मोहटोला-शिरपूरच्या जंगलात त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला. दुपारी शिरपूर-मोहटोला  येथील काही नागरिक मोहटोला-शिरपूरच्या जंगलात सिंधी आणण्यासाठी गेले असता मुख्य रस्त्यापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दोनाडकर यांना घटनास्थळी नेऊन दाखविले. त्यांनी साडीवरून ती आपली पत्नीच असल्याचे सांगितले. या प्रकरणातील संशयित आरोपी कुंदन ठाकरे याला ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस