शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

देशाची सर्वदृष्ट्या सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Updated: August 26, 2016 01:08 IST

पूर्वीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमही नव्हता.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : तिरंगा रॅलीचा समारोपगडचिरोली : पूर्वीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमही नव्हता. त्यामुळे मागील काळात देशाची आर्थिक पिछेहाट झाली. मात्र विकासदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी भारताची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. विद्यमान केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या काळात देशातील खाणीतून भारताला ३ लाख ३० हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेक इन इंडिया, स्किल इन इंडियाच्या माध्यमातून भारताची संपन्नतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. तसेच केंद्र शासनाकडून आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे, त्यामुळे देश सुरक्षितता व संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनापासून तिरंगा रॅली हा कार्यक्रम सुरू आहे. त्याचा समारोप गुरूवारी नामदार अहीर यांच्या उपस्थित गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात झाला. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. या कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, चंद्रपूर जि. प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रकाश पोरेड्डीवार, नाना नाकाडे, किसन नागदेवे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, चंद्रपूरच्या जि. प. सदस्य ताराबाई कोटगले, स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, अनिल फुलझेले, मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, विलास भांडेकर, शशिकांत साळवे, अनिल पोहणकर, रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी, रवींद्र बावनथडे, प्रशांत भृगुवार, दामोेदर अरगेला, बबलू हुसैन आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने भारतभर तिरंगा यात्रेचा कार्यक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आता सरकारच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांचा व क्रांतिकारांचा ६०० पानांचा सोनेरी इतिहास लिहिल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात दौरे करून भारताशी परकीयांचा संबंध वाढविला. तसेच परकीय गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढविली. केंद्र सरकारच्या वतीने सीमा सुरक्षा वाढविण्यात येणार असून त्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील आतंकवाद, नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पिपरे, संचालन प्रशांत वाघरे यांनी केले तर आभार रवींद्र ओल्लालवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)