टॉवर लाईनसाठी खोदला पहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:20+5:30

लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारच्या वन अधिनियम १९७२ नुसार पहाडांचे खनन करता येत नाही.

mountain dug for tower line | टॉवर लाईनसाठी खोदला पहाड

टॉवर लाईनसाठी खोदला पहाड

Next
ठळक मुद्देकारवाईची मागणी : पुराडा-बेडगाव वन परिक्षेत्रामधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : टॉवरलाईन जंगलातून जात असताना शासनाच्या परवानगीनेच आवश्यक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. टॉवर लाईनमध्ये जर पहाड आल्यास लाईनला वळण देऊन ती पुढे नेली जाते. परंतु पुराडा-बेडगाव या दोन्ही वन परीक्षेत्राच्या मधोमध असलेला पहाड लॉकडाऊनपूर्वी खोदून तेथून टॉवरलाईन नेण्यात आली. असे असताना वन विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारच्या वन अधिनियम १९७२ नुसार पहाडांचे खनन करता येत नाही. टॉवरलाईन जात असल्यास पहाडाच्या ठिकाणापासून लाईनला वळण दिले जाते. परंतु या नियमाला मूठमाती देत टॉवरलाईनचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व शासकीय यंत्रणेने पहाडाचे खोदकाम केले. वन विभागाच्या दुर्लक्षितपणानेच हे झाल्याचे बोलले जात आहे. पहाड तोडण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असताना पोकलॅन मशिन ताब्यात घेण्यात आली. परंतु मशीनची सुटकाही केली. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

परवानगीबाबत संभ्रमावस्था कायम
संबंधित वन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी खोदकामाची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबतचे पत्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे या कामाला खरंच परवानगी होती की नाही, याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. अनेक विकासात्माक कामांसाठी वनकायद्यावर बोट ठेवून अडवणूक होत असताना या कामासाठी परवानगी कुणी आणि कशी दिली याबद्दल चर्चा सुरू आहे.

Web Title: mountain dug for tower line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.