पावसाने लाखोंचा तेंदूपत्ता नदीच्या पाण्यात

By Admin | Updated: June 8, 2015 02:12 IST2015-06-08T02:12:02+5:302015-06-08T02:12:02+5:30

नदीच्या पात्रात लावण्यात आलेल्या तेंदूपत्त्याच्या फळ्यांना पावसाचा फटका बसला असून लाखो रूपयांचा तेंदूपत्ता नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे.

Lakhs of rain water in the water of the Tendupta river | पावसाने लाखोंचा तेंदूपत्ता नदीच्या पाण्यात

पावसाने लाखोंचा तेंदूपत्ता नदीच्या पाण्यात

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या गावांचे नुकसान : नदी पात्रात तेंदूफळ्या लावल्याचा परिणाम
एटापल्ली : नदीच्या पात्रात लावण्यात आलेल्या तेंदूपत्त्याच्या फळ्यांना पावसाचा फटका बसला असून लाखो रूपयांचा तेंदूपत्ता नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे.
गोळा केलेला तेंदूपत्ता लवकर सुकावा यासाठी एटापल्ली तालुक्यातील तेंदूपत्त्याच्या फळ्या नदीच्या पात्रातील रेतीवर लावण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यात वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे काही तेंदूपत्ता उडून नदीतील पाण्यामध्ये गेला. तर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सदर तेंदूपत्ता वाढलेल्या पाण्याच्या पातळीबरोबरच वाहत आला आहे. जांभिया व गट्टा या दोन गावांच्या मध्ये असलेल्या नदीमध्ये हजारो तेंदूपत्त्याचे पुडके वाहून आले आहेत. यामुळे संबंधित गावकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Lakhs of rain water in the water of the Tendupta river