शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मन्नेराजाराम परिसरात रस्ता दुरूस्ती करून बस पाठवा

By admin | Updated: September 21, 2016 02:30 IST

मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी,

पोलिसांना निवेदन : गावकऱ्यांची घेतली सभा
भामरागड : मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मन्नेराजाराम भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात येऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी हे निवेदन स्वीकारले व या प्रश्नाचा भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. पोलीस अधीक्षकांनी दखल घेत मन्नेराजाराम भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याची सूचना पोलिसांना दिली.
त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व शासनाकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली. निवेदन देताना पोलीस उपनिरिक्षक दळवी, पाटील, बोरसे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)