शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृतीतून मानवी मनाचा विकास\

By admin | Updated: January 6, 2015 23:01 IST

पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात. पुस्तकांमुळेच वैचारिक प्रगल्भता व सामाजिक जाण रुंदावत जाते. त्याच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान लाभले असले तरी वाचन

गडचिरोली : पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात. पुस्तकांमुळेच वैचारिक प्रगल्भता व सामाजिक जाण रुंदावत जाते. त्याच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान लाभले असले तरी वाचन संस्कृतीतूनच मानवी मनाचा विकास खऱ्या अर्थाने होतो, असा सूर परिसंवादातील साऱ्याच वक्त्यांनी काढला.शिक्षण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवादरम्यान ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वाचन संस्कृतीवर होणार परिणाम’ या विषयावर आयोजित परिसंवादाचे उद्घाटन विद्यार्थिनी कृष्णा देशमुख हीच्या हस्ते करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डी. एन. चापले होते. प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य मेश्राम, प्रा. नरेंद्र आरेकर, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाठ, प्रा. विलास खुणे, चेतन ठाकरे, जयंत येलमुले, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, सविता सादमवार आदी उपस्थित होते. आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांचा समाजमनावर सकारात्मक परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र अलीकडच्या काळातील इंटरनेटचलीत सोशल मीडियामुळे तंत्रज्ञानाचा पगडा वाढला असल्याची खंतही वक्त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर माहिती उपलब्ध होण्याची सोय असली तरी ग्रंथ वाचनातून मनावर होणारे संस्कार आजही तितकेच परिणामकारक आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावातही वाचन संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे मत मांडले. (स्थानिक प्रतिनिधी)