शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

विशाखा समित्यांबाबत वनविभाग झाला सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे.

ठळक मुद्देपाचही वनविभागांमध्ये समित्या होणार अपडेट; वनसंरक्षकांनी घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अमरावती जिल्ह्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे गडचिराेली येथील वनविभागही सतर्क झाला असून, गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक  किशाेर मानकर यांनी विशाखा समित्यांबाबत आढावा घेतला. समित्यांचे पुनर्गठन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेने विशाखा समित्यांचे पुनर्गठन करावे, अशी मागणी वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबत गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशाेर मानकर यांना विचारले असता, पाचही वनविभागांमध्ये विशाखा समित्या कार्यरत आहेत. या समित्यांचे काही सदस्य बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती दिली.

महिला कर्मचाऱ्यांच्या मर्यादा समजून घ्या महिला व पुरुष यांच्या शारीरिक जडणघडणीत फरक आहे. महिला ही अधिकारी असली तरी तिच्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन करून दरवर्षी या समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कार्यालये या समित्यांचे पुनर्गठन करीत नाही. त्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास तक्रार करायची कुठे, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांसमाेर उपस्थित हाेत आहे.  प्रशासनात काम करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिला थाेड्या अधिक भावनिक राहतात. मात्र मनात कठाेरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग