शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : विविध विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शुक्रवारी ब्रह्मपुरी विश्रामगृहावर आले असताना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ब्रह्मपुरी येथील नाट्यगृह, बारई तलावाचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. नगर पालीकेच्या २२ कोटी रुपयांच्या नळयोजनेचा आढावा घेतला. तसेच सर्व क्रीडा संकूल पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. सिंदेवाही येथील विश्रामगृह दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे निर्देश देत उपविभागातील तलाठी कार्यालय, त्यांची सद्यस्थिती व निर्मिती संदर्भातही त्यांनी यावेळी आढावा घेतला. असोलामेंढा पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.नुकसान भरपाईचा आढावासावली परिसरात पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. असून १२ हजार ८५६ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असून ७२७२.९० हेक्टरवर नुकसान झाले होते. आतापर्यंत चार कोटीवर यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्यापैकी तीन कोटी ८७ लाख वितरीत करण्यात आले. तर ब्रह्मपुरी तालुक्यात देखील चार हजार ३३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले होते. ३१४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी १ कोटी ९३ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार