जीर्ण अंगणवाडी केंद्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:18+5:30

गावकऱ्यांनी वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. पेंटिपाका चेक येथील जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत एक कुटुंब मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहे.

Fire at dilapidated Anganwadi center | जीर्ण अंगणवाडी केंद्राला आग

जीर्ण अंगणवाडी केंद्राला आग

ठळक मुद्देपेंटिपाका येथील घटना : दक्षता घेतल्याने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या तुमनूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पेंटिपाका चेक येथील जीर्ण मिनी अंगणवाडी केंद्राला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली. गावकऱ्यांनी वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.
पेंटिपाका चेक येथील जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत एक कुटुंब मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील एका व्यक्तीने घरातील कागदांना आग लावली. आग लावल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. त्यामुळे मोठी हानी टळली. घरात सिलिंडर होता. मात्र सिलिंडरचा स्फोट झाला नाही. तसेच या खोलीत जास्त साहित्य नव्हते. त्यामुळेही आग दुसरीकडे पसरली नाही. अवैैधरितीने या इमारतीत राहणाºया कुटुंबावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Fire at dilapidated Anganwadi center

टॅग्स :fireआग