शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दारूसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST

अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास एमएच १२ डीई ७४११ क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअहेरीसह कुरखेडा, आरमोरीतही कारवाई : दोन आरोपीला अटक; चारचाकी वाहनातून सुरू होती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/कुरखेडा/आरमोरी : अहेरीनजीकच्या देलवलमरी मार्गावर सापळा रचून अहेरी पोलिसांनी दारू व वाहन मिळून एकूण पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास केली.अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास एमएच १२ डीई ७४११ क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसून आले. या वाहनाला थांबवून झडती घेतली असता, १ लाख ६० हजार रुपयांचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी चारचाकी वाहन व दारू मिळून २ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक डांगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर.नरोटे, पोलीस हवालदार पेंदाम, नाईक पोलीस शिपाई अलाम यांनी केली. देवलमरी हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पोलिसांची गस्त ठेवणे कठीण होत असते. याचा फायदा घेऊन अनेक दारू तस्कर रात्री दारू वाहतूक करतात.पाथरगोटा, जोगीसाखरात पोलिसांची कारवाईआरमोरी पोलिसांनी तालुक्याच्या पाथरगोटा येथील झुडूपी जंगलातून मंगळवारी देशी दारूच्या ७० निपा जप्त केल्या. तसेच जोगीसाखरा मार्गावरून वाहनातून नेण्यात येणारी ५० लीटर मोहफूल दारू जप्त केली. ३५ हजार रुपये किमतीचे दुचाकी वाहन ताब्यात घेतले. पाथरगोटा येथील कारवाईत आरोपी गोकूळदास धोंगडे (३६) रा. जोगीसाखरा व महेश माटे रा.डोंगरगाव यांच्यावर तर दुसºया कारवाईत जगदीश खोबरागडे रा.आरमोरी, नीलेश श्रीकुंठवार व चरण ताडाम रा.जांभळी यांच्यावर गुन्हा दाखल केला.महिलांनी केला ९० किलो सडवा जप्तकुरखेडा : तालुक्यातील मोहगाव जंगल परिसरात तीन ठिकाणी धाडी टाकून जप्त करण्यात आलेला ९० किलो मोहसडवा व साहित्य गावसंघटनेच्या महिलांनी नष्ट केला. तळेगाव व वाकडी येथील महिला-पुरुषांनी केलेल्या अहिंसक कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मोहगाव व तळेगाव येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री केल्या जाते. या दोन्ही गावातील दारूविक्रेते जंगल परिसरात भट्ट्या सुरु करून गावात दारूची विक्री करतात. यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिक दारू पिण्यासाठी या गावांकडे धाव घेतात. याचा त्रास दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. यामुळे तळेगाव व वाकडी येथील गाव संघटनेच्या महिलांनी मोहगाव जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार तीन ठिकाणी धाडी टाकून ९० किलो मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून नष्ट केले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस