शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीन तास राेखली वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळी होती. परंतु २-३ महिन्यांपासून येथे काही लाेकांनी अतिक्रमण केले. तेथील जागेची विक्री घरे बांधण्यासाठीही करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : चराईसाठी राखीव जागा ग्रामपंचायतला द्यावी, वन जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, धान खरेदी केंद्र सुरू करावे, कृषी पंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुराडा गट ग्रामपंचायतीमधील ४ गावांनी पुराडा येथे बुधवारी रास्ता राेकाे आंदाेलन करून ३ तास वाहतूक राेखली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळी होती. परंतु २-३ महिन्यांपासून येथे काही लाेकांनी अतिक्रमण केले. तेथील जागेची विक्री घरे बांधण्यासाठीही करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायतीने तलाठ्यांना माहिती देऊन राखीव जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून जागेची मोजणी तहसीलदार यांच्या परवानगीने करून त्याची ‘क’ सीट तयार करण्यात आली. ही जागा ग्रा.पं.ला हस्तांतरण करावी यासाठी १५ नाेव्हेंबरला ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला. ही शासकीय जागा हडपण्याचा काही लाेकांचा डाव आहे. त्यामुळे जागेचा मालकी हक्क ग्रामपंचायतीला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदाेलनात सरपंच अशाेक उसेंडी, राजेंद्रसिंह ठाकूर, पेशीलाल साेनागर, दिवाकर मारगाये, घिसूजी खुणे, मनाेहर साेनवाणी, उपसरपंच रामचंद्र राेकडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले हाेते.

धान खरेदी, वीजपुरवठ्याचाही प्रश्न ऐरणीवरयाशिवाय तालुक्यातील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करावे. कृषी पंपांना पूर्ण दाबाच्या वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत  नाही. काही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलात दुरुस्ती करावी व पूर्ववत २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी आंदाेलनातून करण्यात आली. 

अधिकाऱ्यांची आंदाेलनस्थळी भेटआंदाेलनादरम्यान नायब तहसीलदार अंताराम मडावी, आविमचे व्यवस्थापक बावणे, पुराडाचे आरएफओ डिगाेडे व महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदाेलन स्थगित करण्यात आले. आरएफओंनी ४१ अतिक्रमणधारकांवर काेर्ट केस केली आहे, असे सांगितले.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप