पाेलिसांच्या पुढाकाराने १ हजार ५८० युवकांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:00 AM2021-07-26T05:00:00+5:302021-07-26T05:00:36+5:30

पोलिसांच्या नागरी कृती शाखेच्यावतीने २४ जुलै राेजी आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळालेले युवक हैदराबाद येथे, तर नर्सिंग असिस्टंट म्हणून नियुक्ती मिळालेल्या युवती वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सोमय मुंढे (अभियान) प्रामुख्याने उपस्थित होते.

Employment of 1,580 youths through Paelis initiative | पाेलिसांच्या पुढाकाराने १ हजार ५८० युवकांना राेजगार

पाेलिसांच्या पुढाकाराने १ हजार ५८० युवकांना राेजगार

Next
ठळक मुद्देदाेन वर्षातील कामगिरी, सुरक्षारक्षक, नर्सिंग असिस्टंट पदावर नियुक्ती

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने  मागील दाेन वर्षात जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील आतापर्यंत १५८० युवक-युवतींना रोजगार मिळाला. त्यात ३७५ सुरक्षारक्षक, १०६० नर्सिंग असिस्टंट, १०० हॉस्पिटॅलिटी, तर ४५ ऑटोमोबाईल क्षेत्रात राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. २४ जुलै राेजी आयाेजित राेजगार मेळाव्यात ३५ युवकांना सुरक्षारक्षकपदी, तर ७० युवतींना नर्सिंग असिस्टंटपदी  नियुक्ती मिळाली. 
पोलिसांच्या नागरी कृती शाखेच्यावतीने २४ जुलै राेजी आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळालेले युवक हैदराबाद येथे, तर नर्सिंग असिस्टंट म्हणून नियुक्ती मिळालेल्या युवती वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सोमय मुंढे (अभियान) प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. या संधीमुळे कुटुंबीयांचे जीवनमान उंचावेल. आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रपरिवाराला याबाबतची माहिती देऊन पोलिसांच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एम्स प्रोटेक्शन प्रा. लि., हैदराबादचे मलेश यादव, लाईफ सर्कल हेल्थ सर्व्हिसेसचे श्रीनिवास सुधाला, ओल्ड एज होम हैदराबादच्या अंकिता बोरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एपीआय महादेव शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नक्षल्यांसाेबत लढतानाच गडचिराेली पाेलीस दल असे समाजाेपयाेगी उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांची नागरिकांकडून प्रशंसा हाेत आहे.

१२९ युवकांनी थाटला स्वयंराेजगार
पाेलिसांच्यावतीने युवकांना स्वयंराेजगाराचेही प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण घेतलेल्या १२९ युवक-युवतींनी व्यवसाय स्थापन करून ते स्वावलंबी बनले आहेत. पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींनी सुध्दा स्वत:चा राेजगार सुरू केला आहे.

Web Title: Employment of 1,580 youths through Paelis initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.