शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका

By संजय तिपाले | Updated: September 6, 2024 14:44 IST

भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर अजित पवार यांचे भाष्य : मंत्री धर्मरावबाबांची भरसभेत आगपाखड

गडचिरोली: घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत, घरात फूड पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले. ज्या बापाने जन्म दिला, त्याच्याच विरोधात लढणार का, असं कसं चालेलं, असा सवालही त्यांनी केला.

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे क्रीडा संकुल प्रांगणात ६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकॉ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम आदी उपस्थित होते. 

भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चा होत्या.  त्या अहेरीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धर्मरावबाबा यांनी भरसभेत पहिल्यांदाच जाहीररीत्या भाष्य  केले. हा धागा पकडून अजित पवार यांनी स्वत:चे उदाहरण दिले. मात्र, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका असा सल्लाही त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला. पुढे ते म्हणाले, लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण धर्मरावबाबांनी तुम्हाला बेळगावला न पाठवता येथेच राजकारणात संधी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष केले. वस्ताद कुस्तीचे सगळे डाव शिकवतो व एक राखून ठेवतो, असा इशारा त्यांनी दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रत्येकाची ठराविक वेळ असते, धर्मरावबाबा यांना एकदा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.  

मुलगी माझी होऊ शकली नाही, दुसऱ्यांची कशी होईल? : धर्मरावबाबा

आयुष्यभर इतर पक्ष फोडण्याचे काम केल्यानंतर शरद पवार माझे घर फोडायला निघाले आहेत ,असा आरोप मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. अहेरीत मेळावा घेऊन ते प्रवेश करवून घेणार आहेत, असे सांगून त्यांनी माझी मुलगी माझी होऊ शकली ती दुसऱ्यांची कशी होणार, असा सवाल केला.   एक मुलगी व जावई सोडून जात असले तरी भाऊ, मुलगा, दुसरी मुलगी व संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGadchiroliगडचिरोली