शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करा

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी

गडचिरोली : देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हा मराठी विज्ञान परिषद गडचिरोलीच्यावतीने जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्लास्टिकचा समूळ नायनाट झाला पाहिजे. सध्या जिल्हाभरात प्लास्टिकचा वापर वाढला असून अविघटीत प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मुक्या जनावरांच्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावित असेही जिल्हा मराठी विज्ञान परिषदेने निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी अविघटन होणाऱ्या ५० मॅकॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे मुळातच उत्पादन बंद होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण शासनाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना जिल्हा मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष संजय भांडारकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, उपाध्यक्ष अनिल शेट्टे, कार्यवाह प्रशांत तम्मेवार, सहकार्यवाह तथा कोषाध्यक्ष देवेंद्र म्हशाखेत्री, गोरे, राकेश चटकुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, विवेक हुलके, संजय नार्लावार, अविनाश गौरकार, राजेंद्र हिवरकर, सोनटक्के, गडपल्लीवार, पेरसिंगवार, संगनवार आदी उपस्थित होते.जिल्हा मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनाही या मागणीचे निवेदन दिले आहे. जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याकरिता प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्निर्मिती याबाबत जनजागृती करणे, तसेच यासंदर्भात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना चळवळीच्या रूपाने कार्य करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)