शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

धानोरात शिक्षकांचे धरणे

By admin | Updated: September 1, 2016 01:43 IST

जुनी पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस)/एनपीएस अंमलात आणली.

निवेदन सादर : १० टक्के वेतन कपातीचा हिशेब द्या!धानोरा : जुनी पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस)/एनपीएस अंमलात आणली. या योजनेंतर्गत डीसीपीएस/एनपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून १० टक्के रक्कम कपात करण्यात येते. जि. प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून आत्तापर्यंत जमा झालेल्या रकमेचा पावती स्वरूपात हिशेब देण्यात आला. परंतु आजपर्यंत कपात रक्कम व प्राप्त हिशेब यात खूप तफावत आहे. या संदर्भातील हिशेबाच्या मागणीसाठी मंगळवारी जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने धानोरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार १ नोव्हेंंबर २००५ पासून शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्तीवेतन योजना अंमलात आणली. परंतु या योजनेंतर्गत वेतनाच्या १० टक्के कपात करण्यात येत आहे. सदर रकमेचा हिशेब देण्यात आला. परंतु कपात रक्कम व प्राप्त हिशेब यात तफावत आहे. या संदर्भात जि. प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच पं. स. चे गटविकास अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून निवेदन देऊन हिशेबाची मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाल्याने सदर मागणीसाठी ३० आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शिक्षक समितीचे धनपाल मिसार, ग्रामसेवक संघटनेचे खुशाल नेवारे, रमेश बोरकुटे यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शिक्षक हजर होते. (तालुका प्रतिनिधी)