शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीच्या तलावातील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: September 20, 2016 00:51 IST

चामोर्शी-वाघदरा, आष्टी-चामोर्शी रस्त्याच्या मधोमध असलेल्या तलावामध्ये गडचिरोली, चामोर्शी रोडलगत तलावाच्या पात्रात...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माणिक तुरे यांची मागणी
गडचिरोली : चामोर्शी-वाघदरा, आष्टी-चामोर्शी रस्त्याच्या मधोमध असलेल्या तलावामध्ये गडचिरोली, चामोर्शी रोडलगत तलावाच्या पात्रात आणि चामोर्शी येथील साजा क्रमांक आठ मधील ८.४८ हेक्टरच्या शासकीय जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी व मासेमार बांधव अडचणीत सापडले आहेत. शिवाय शासकीय कार्यालयाच्या इमारतींना जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे सदर शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभीमान रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संदर्भात तुरे यांनी २३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चामोर्शी शहरालगतच्या व तालुक्यातील मामा तलावात काही धनाढ्य नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमीत जागेवर राईसमिलसारखे उद्योग तसेच धानपीक घेतले जात आहे. परिणामी तलावाचे पात्र कमी होऊन शेतकऱ्यांना शेती सिंचनाची समस्या भेडसावत आहे. तसेच मासेमार बांधवांचा मत्स्यपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. तलावातील व शासकीय जागेवरील अतिक्रमण तत्काळ काढून शेतकरी व मासेमार बांधवांना न्याय द्यावा, असे माणिक तुरे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

तहसीलदारांकडून कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली
चामोर्शी येथील साजा क्रमांक आठ मधील ८.४८ हेक्टर इतक्या शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणधारकांनी सदर जागा स्वत:ला मिळावी, यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज १४ जून २०१६ रोजी गडचिरोली न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच या जागेवर असलेले गैरअर्जदारांचे अतिक्रमण काढून टाकावे, असे आदेश दिले आहेत. मात्र चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून सदर जागेवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाची एसडीओ व तहसीलदारांकडून पायमल्ली होत आहे, अशी माहिती माणिकराव तुरे यांनी दिली आहे.

जागेअभावी एसटी आगार रखडले
राज्य शासनाने चामोर्शी येथे राज्य परिवहन महामंडळाचे एसटी आगाराची इमारत १९८५ ते १९९० दरम्यान मंजूर केली आहे. सदर कार्यालयाच्या इमारतीसाठी एसटी महामंडळाने एसडीओ कार्यालयाकडे अनामत रक्कम सुध्दा भरलेली आहे. मात्र जागा मिळत नसल्याने या कार्यालयाच्या इमारतीचे काम रखडले आहे. तलाव व शासकीय जागेवरील अतिक्रमण काढल्यास इमारतीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, या बाबत प्रशासनाने कार्यवाही करून चामोर्शीतील एसटी आगार कार्यालय विनाविलंब कार्यान्वित करावा, अशी मागणी तुरे यांनी केली आहे.