पुलाअभावी भामरागडात धोकादायक प्रवास

By Admin | Updated: January 31, 2016 01:26 IST2016-01-31T01:26:55+5:302016-01-31T01:26:55+5:30

शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी स्वातंत्र्यांच्या ६६ वर्षानंतरही ....

Dangerous journey to Bhamargad in the absence of bridge | पुलाअभावी भामरागडात धोकादायक प्रवास

पुलाअभावी भामरागडात धोकादायक प्रवास

गोलागुडा- जारेगुडा मार्ग : पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधण्याची मागणी
भामरागड : शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी स्वातंत्र्यांच्या ६६ वर्षानंतरही गोलागुडा- जारेगुडा परिसर शासनाच्या विविध सोयीसुविधांपासून वंचित आहे. गोलागुडा व जारेगुडा मार्गावरील पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना डोंग्याच्या सहाय्याने धोेकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भामरागडत लगतच्या पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पामुलगौतम नदीच्या एका बाजुला तर पलिकडे जारेगुडा, गोलागुडा, जुव्वी, दर्भा, मर्दीमालेंगा, इतलवारा आदी गावे आहेत.
भामरागड नजीकच्या पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. पूल नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक डोंग्याद्वारे प्रवास करतात. सदर प्रवास अत्यंत धोकादायक असून अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते. तत्कालीन सभापती मालू कोपा बोगामी यांनी लोखंडी पूल बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र यश मिळाले नाही. आजही येथे लोखंडी पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dangerous journey to Bhamargad in the absence of bridge