आ. धर्मरावबाबा आत्राम व ऋतुराज हलगेकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST2021-04-13T04:34:33+5:302021-04-13T04:34:33+5:30

अहेरी : जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ऋतुराज ...

Come on. Reception of Dharmarao Baba Atram and Rituraj Halgekar | आ. धर्मरावबाबा आत्राम व ऋतुराज हलगेकर यांचा सत्कार

आ. धर्मरावबाबा आत्राम व ऋतुराज हलगेकर यांचा सत्कार

अहेरी : जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ऋतुराज हलगेकर यांचा अहेरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार रोजी राजवाड्यात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली रा.काँ.चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, अमोल मुक्कावार, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने, लक्ष्मण येरावार, सालय्या कंबलवार आदींनी धर्मरावबाबा आणि ऋतुराज हलगेकर यांचा सत्कार केला.

या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना, धर्मरावबाबा म्हणाले, या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच आपला एकमेव उद्देश आहे. वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पाेहचविण्यासाठी, तसेच सोयी, सुविधा व मूलभूत गरजा पुरविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून विकासकामांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Come on. Reception of Dharmarao Baba Atram and Rituraj Halgekar