शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली शहरात टोमॅटो पाेहाेचले १०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली बाजारपेठेत टोमॅटोचे भाव १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. आजपर्यंत एक किलाे टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर केवळ पावभर टोमॅटो खरेदी करण्याची वेळ आली आहे. गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. प्रत्येक भाजीत टोमॅटोचा वापर केला जाते. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढल्याबराेबर अनेकांचे बजेट बिघडले आहे.

गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे प्रतिकिलाे दरभाजीपाला    दरटोमॅटो    १००पत्ताकाेबी    ४०फूलकाेबी    ६०कारले    ६०वांगी    ४०कांदे    ५०सांबार    ८०आलू    ४०चवळी शेंगा    ६०

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जातो. त्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याच्या दरावर गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे दर अवंलबून आहेत. मागील तीन दिवसांपासून नागपूर बाजारपेठेतील टोमॅटोची आवक घटली असल्याने भाव वाढले आहेत. तसेच डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे टोमॅटोसह इतर भाजीपाला महाग झाला आहे. - जितेंद्र बाळेकरमकर, भाजीपाला व्यापारी

इंधनवाढीचा परिणामगडचिराेली शहर व जिल्ह्यात येणारा भाजीपाला शेकडाे किमी अंतरावरून वाहतूक करून आणला जाते. यासाठी माेठ्या प्रमाणात वाहतूक खर्च येताे. मागील काही दिवसांपासून डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक दरातही वाढ झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावर दिसून येत आहे.

जिल्ह्यातील पावसाने केल्या पालेभाज्या नष्ट

गडचिराेली जिल्ह्यात नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक, सांबार, चवळीमाट, मुळा यांची लागवड केली हाेती. मात्र, आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची राेपे नष्ट झाली आहेत. नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक स्वस्त मिळण्यास सुरुवात हाेते. मात्र, उत्पादन कमी झाल्याने पालेभाज्या अजूनही महागच आहेत. 

 

टॅग्स :vegetableभाज्या