शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारासह चितळ ठार, युवती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

वनपरिक्षेत्र कुनघाडा रै, गिलगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १०९ मधील दुधवाई जंगल परिसरातून जात असताना गिलगाव-पोटेगाव मुख्य मार्गावर एक चितळ अचानक आडवा आला. त्यामुळे दुचाकीची चितळाला जोरदार धडक बसली. या धडकेत चितळ जागीच ठार झाला. सोबत दुचाकीस्वार खाली कोसळल्याने सुनील कडयामी यांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला, जखमी युवती काजल पोटावी हिच्यावर उपचार सुरू आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पोलीस मदत केंद्र पोटेगाव हद्दीतील कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रात भरधाव दुचाकीने चितळाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व चितळ ठार झाले. यात दुचाकीवरील युवती जखमी झाली. सुनील मनकू कडयामी (वय ३३) रा. भेंडीकन्हार असे मृत इसमाचे नाव आहे, तर काजल भीमराव पोटावी (२२) रा. मालेरमाल असे जखमी युवतीचे नाव आहे. हा अपघात दि.२४ च्या संध्याकाळी ७.३०  वाजताच्या  सुमारास भेंडीकन्हार दुधवाईजवळ घडला.प्राप्त माहितीनुसार, मृत सुनील मनकू कडयामी यांची भाची काजल भीमराव पोटावी ही कार्यक्रमानिमित्त भेंडीकन्हार येथे मामाकडे आली होती. कार्यक्रम पार पडल्यानंतर मृतक सुनील कडयामी हे भाचीला तिच्या गावी पोहोचविण्यासाठी गिलगावमार्गे दुचाकीने (एमएच ३३, वाय ९२५८) निघाले होते. वनपरिक्षेत्र कुनघाडा रै, गिलगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १०९ मधील दुधवाई जंगल परिसरातून जात असताना गिलगाव-पोटेगाव मुख्य मार्गावर एक चितळ अचानक आडवा आला. त्यामुळे दुचाकीची चितळाला जोरदार धडक बसली.या धडकेत चितळ जागीच ठार झाला. सोबत दुचाकीस्वार खाली कोसळल्याने सुनील कडयामी यांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला, जखमी युवती काजल पोटावी हिच्यावर उपचार सुरू आहेत. 

मृत चितळाचे दहनदुचाकीच्या धडकेत चितळ ठार झाल्याचे कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र      सहायक एस. एम. मडावी यांच्या चमूने घटनास्थळ गाठून  मृत चितळास ताब्यात घेतले. गिलगाव येथील पशुधन विकास अधिकारी गोंगल व सहायक चौधरी यांनी चितळाचे शवविच्छेदन  केले असता दुचाकीची धडक बसल्यामुळे श्वास रोखून चितळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ते मादी चितळ गरोदर अवस्थेत होते. सर्व चौकशीअंती मृत चितळाचे कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात दहन करण्यात आले. यावेळी वनरक्षक देवेंद्र वासेकर, वनरक्षक कौशल्या मडावी, वनरक्षक आय. आर. भेंडेकर व इतर वन कर्मचारी हजर होते.

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी बाहेर-    अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रात्रीच्या वेळी बाहेर पडत असतात. मुख्यतः रस्त्यावर येत असतात. त्यामुळे जंगली भागात रस्त्याने वाहन चालवताना दक्षता घ्यावी, समोरचा धोका टाळण्यासाठी वाहने हळू चालवावी आणि स्वत:सोबत वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे व क्षेत्र सहायक एस. एम. मडावी यांनी केले.

 

टॅग्स :Accidentअपघात