मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:38+5:30

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Chief Minister's interaction with farmers in the district | मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

Next
ठळक मुद्देकृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यातील सेंद्रीय आणि गट शेतीचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.
चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.
यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करते. कोरोनादरम्यान त्यांनी सर्व जनतेला भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेती केली जात असेल तर हा अतिशय चांगला उपक्रम असून राज्यातील इतर शेतकºयांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.

शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा
गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकºयाने विषमुक्त शेताचे महत्व पटवून देताना सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. ती तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकºयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Chief Minister's interaction with farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.