शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अन् बामनपेठच्या तलावात उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

By admin | Updated: May 13, 2017 02:05 IST

कोनसरी येथील लोक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशील भागात जंगलालगत

तलाव खोलीकरणाचे उद्घाटन : अतिसंवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : कोनसरी येथील लोक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशील भागात जंगलालगत असलेल्या बामनपेठच्या तलावात हेलिकॉप्टर उतरविले. त्यानंतर येथील मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचे त्यांनी स्वत: उद्घाटन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार, मार्र्कंडा कं. च्या सरपंच अनिता अवसरमोल, गंगाधर पोटवार, संजय पंदिलवार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार कायम पाठीशी राहणार असून शासनातर्फे शेतकऱ्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका शाळकरी मुलीस काही प्रश्न विचारले. मात्र त्या मुलीने समर्पक उत्तरे दिली नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील लक्तरे वेशीवर टांगल्याचे यावेळी स्पष्ट झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मामा तलावाची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. बंदोबस्त पीएसआयच्या भरवशावर अतिसंवेदनशील बामनपेठ गावातील जंगल परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी दौरा होता. मात्र त्यांच्या बंदोबस्तासाठी या बामनपेठ परिसरात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस दर्जाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पोलीस बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे यांनी सांभाळली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अतिसंवेदनशील भागात नियोजित दौरा असतानाही पोलीस विभागाचा निष्काळजीपणा दिसून आला. याचीही चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली होती.