शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने निवडणुकीतील वचन पाळावे

By admin | Updated: November 13, 2014 23:02 IST

निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने

पत्रकार परिषद : वामनराव चटप यांचे सरकारला आवाहनगडचिरोली : निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने पाळून स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, असे आवाहन माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले. स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन भाजपाने दिल्याने विदर्भातील जनतेने भाजपावर विश्वास ठेवत सर्वाधिक ४४ आमदार विदर्भातून निवडून दिले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत ३१ मार्च २०१५ ला संपत आहे. या महामंडळाची मुदत वाढवून देण्यापूर्वीच केंद्राने स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी. विदर्भाचा अनुशेष हजारो कोटींच्या घरात आहे. केंद्र व राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर नजर टाकल्यास विदर्भासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणे अशक्य आहे. विदर्भातील साधन संपत्तीचा वापर करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे. यानंतर विदर्भातील साधन संपत्तीची लुट थांबविणे आवश्यक आहे. यासाठी तीव्र लढा उभारला जाईल. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन १३ व १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा लढा उभारण्याविषयी व्यापक चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राम नेवले, नंदा पराते, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)