शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपलाही अनपेक्षित मिळाला विजय

By admin | Updated: May 17, 2014 00:14 IST

१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल

गडचिरोली : १0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल, हे मात्र अपेक्षीत नव्हते. हा विजय लाखाच्या फरकाने होईल, असा सट्टाबाजारासह राजकीय क्षेत्रातील विविध पक्षाच्या जाणकारांचा अंदाज होता. गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रत्येकी ३0 हजाराची आघाडी मिळेल व जिल्ह्याबाहेरील मतदार संघात किमान ५ ते १0 हजाराचे मताधिक्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात राहिल, असे जाणकार मानत होते. त्यामुळे भाजपच्या व काँग्रेसच्या विजयाचा अंतर हे सव्वालाखाच्या आसपास अंतरावर राहिल, हे मात्र अनेकांना वाटत होते. परंतु आज पहिल्या फेरीपासूनच मतमोजणीला सुरूवात झाल्यावर अशोक नेते यांच्या विजयाचा झंझावात सुरू झाला. पहिल्या फेरीत ११ हजार ८३९, दुसर्‍या फेरीत २0 हजार ७३६, तिसर्‍या फेरीत ३३ हजार ९७७ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत ५ ते १0 हजाराच्या फरकात चालत राहिली. कुठल्याही फेरीत काँग्रेस उमेदवार आघाडी घेऊ शकले नाही. काँग्रेसलाही निवडणुकीच्या मतदानानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघांमध्ये आपल्याला आघाडी राहणार नाही, याची जाणीव झालेली होती. मात्र चिमूर आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रात आपण निश्‍चितपणे आघाडी घेऊ, अशी अपेक्षा होती. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने ६९ हजार मतांची घेतलेली आघाडी काँग्रेसला प्रचंड फटका देणारी ठरली. या ठिकाणी भाजपला मिळालेला कौल हा काँग्रेससाठी सर्वात मोठा दणका होता व या कौलामुळे भाजपला २ लाखापर्यंतच्या मताधिक्याची मजल गाठता आली. गडचिरोली जिल्ह्यात आजवरच्या मोठय़ा निवडणुकांमधला हा मताधिक्याचा उच्चांक आहे. पुर्णत: आदिवासीबहुल नसलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गैर आदिवासी मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्ण पाठ फिरविल्याने हा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक ठरला. (प्रतिनिधी)