शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; आराेग्य प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या रुग्णांवर एकाचवेळी उपचार करताना आराेग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले हाेते. दुसऱ्या लाटेत जवळपास ६५० नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात दुसरी लाटच सुरू आहे. मात्र दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट येण्याचा धाेका वर्तविला जात आहे. भारतात डेल्टा रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. तिसरी लाटही प्राणघातक ठरण्याची शक्यता असल्याने आराेग्य विभाग सजग झाला आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन प्लांट हाेणार लवकरच सुरू; बालकांसाठी बेड आरक्षित

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : देशात काेराेनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची घाेषणा जागतिक आराेग्य संघटनेने केली आहे. भारतातही दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट सुरू हाेण्याचा धाेका वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचा आराेग्य विभाग सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे. 
दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या रुग्णांवर एकाचवेळी उपचार करताना आराेग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले हाेते. दुसऱ्या लाटेत जवळपास ६५० नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात दुसरी लाटच सुरू आहे. मात्र दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट येण्याचा धाेका वर्तविला जात आहे. भारतात डेल्टा रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. तिसरी लाटही प्राणघातक ठरण्याची शक्यता असल्याने आराेग्य विभाग सजग झाला आहे. आवश्यक उपपाययाेजना करण्यास सुरूवात झाली आहे. 

महिनाभरापासून रुग्णसंख्या १०० च्या वरच
मागील महिनाभरापासून रुग्णांची संख्या १०० ते २०० च्या जवळपासच आहे. ती १०० पेक्षा अजूनही कमी झाली नाही. काही दिवस काेराेनामुक्त हाेणाऱ्यांपेक्षा काेराेनाबाधितांची संख्या अधिक राहते. ही स्थिती मागील महिनाभरापासून कायम आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास दुसरी लाट ओसरण्याअगाेदरच तिसऱ्या लाटेलाही सुरुवात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे
- दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांना माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत हाेती. ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आला आहे. विद्युत पुरवठा व इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ताे लवकरच सुरू हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा प्लांट सुरू झाल्यास आराेग्य विभागाला फार माेठा आधार ठरणार आहे. 

२० टक्के बेड मुलांसाठी राखीव
- गडचिराेली जिल्ह्यात २ हजार २०० पेक्षा अधिक बेड आहेत. यातील २० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ४८४ सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम असलेले बेड आहेत. तर २०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेडपैकी १० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या