३० पासून कुष्ठरोग व क्षयरोग जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:31+5:30

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरोगाची व्याप्ती दर दहा हजार लोकसंख्येमागे ६.७४ एवढी आहे. सर्वात जास्त व्याप्ती असणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.

Awareness of leprosy and tuberculosis from 1 | ३० पासून कुष्ठरोग व क्षयरोग जागृती

३० पासून कुष्ठरोग व क्षयरोग जागृती

Next
ठळक मुद्दे१३ फेब्रुवारीपर्यंत अभियान : जिल्हा पातळीवर नियोजन; जनजागृती करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुष्ठरोग व क्षयरोग या आजारांबाबत जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आले.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरोगाची व्याप्ती दर दहा हजार लोकसंख्येमागे ६.७४ एवढी आहे. सर्वात जास्त व्याप्ती असणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.
गडचिरोली जिल्ह्यासोबतच चंद्रपूर, वर्धा येथेही मोठ्या प्रमाणात कुष्ठरोगी आढळून येतात. कुष्ठरोगाबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर करणे. लोकांच्या वेळीच तपासण्या करून घेणे.
आजारी नागरिकांना वेळेत औषधोपचार करणे, याबाबत माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्याचा व्याप्ती दर ६.७५ वरून १ वर आणणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक कुष्ठरोगाची अहेरी तालुक्यात ४.९५, आरमोरी ८.८५, भामरागड ४.४५, चामोर्शी ७.२६, धानोरा ३.४३, एटापल्ली २.८२, गडचिरोली १०.२९, कुरखेडा ४.४६, मुलचेरा ५.२३, सिरोंचा ७.४ व देसाईगंज ११.५३ एवढी आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत होणार चर्चा
२६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. या ग्रामसभेत जिल्हाधिकारी यांनी केलेले लेखी आवाहन सर्व ग्रामस्थांना वाचून दाखविले जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेला आवाहन केले आहे. हे आवाहन वाचून दाखविले जाणार आहेत. तसेच कुष्ठरोग व क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिज्ञा दिली जाणार आहे. शासनाकडून कुष्ठरोग या शब्दाऐवजी कुष्ठांतेय हा शब्द वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुष्ठांतेय याचा अर्थ कुष्ठरोगावर विजय मिळविणारा असा होतो. कुष्ठरोग हा औषधोपचाराने बरा होणार रोग आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे दिसताच नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले जाणार आहे.

Web Title: Awareness of leprosy and tuberculosis from 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य