शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

By admin | Updated: September 4, 2016 02:00 IST

पाणी पुरवठा योजनेच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी येथील पाणीपुरवठा योजनेला मागील सहा वर्षांपासून मंजुरी रखडली होती.

सर्व्हेचे काम सुरू : वैरागडातील पाणीटंचाईची समस्या सुटणारवैरागड : पाणी पुरवठा योजनेच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी येथील पाणीपुरवठा योजनेला मागील सहा वर्षांपासून मंजुरी रखडली होती. अखेर प्रशासनाने सदर योजना निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली असून पाईपलाईन टाकण्यासाठी सर्व्हेच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे विद्यमान सदस्य व समाज कल्याण सभापती यांच्यात वैरागड येथील पाणी पुरवठा योजनेवरून बरेच दिवस कलगीतुरा चालला होता. पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्याच्या नादात पाच-सहा वर्षांपासून ही योजना रखडली होती. जुन्या योजनेचे पाणी पुरत नसल्याने वैरागड येथे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत होती. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना बांधली जाणार आहे. ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी वैरागड येथे बांधली जाणार आहे. या योजनेची इन्टेकवेल व जॅकवेल गोरजाई डोहावर होणार आहे. या पाणी पुरवठा योजनेला फिल्टरही जोडले जाणार आहे. नवीन पंप गृह बांधून व नवीन पाईपलाईन खोदली जाणार आहे. संपूर्ण गावात या टाकीच्या मार्फतीने पाणी पोहोचविले जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता पांडे यांनी दिली आहे. नवीन पाणी पुरवठा योजना बांधण्यासाठी लेवल सर्वेचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रारूप आराखडा तयार केला जाऊन या कामाला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी लोकमतच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, हे विशेष. (वार्ताहर)