शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

शेतात खाटेवर झोपलेल्या वृद्धाची शस्त्राने गळा चिरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:23 IST

Gadchiroli : तालुक्यातील अतिदुर्गम येथे नेलगुंडा शेतात खाटेवर झोपलेल्या वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड (गडचिरोली) :
तालुक्यातील अतिदुर्गम येथे नेलगुंडा शेतात खाटेवर झोपलेल्या वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना १० जानेवारी रोजी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुसू नरंगो हबका (६६ वर्ष, रा. नेलगुंडा ता. भामरागड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पुसू हबका हे शनिवारी रात्री आपल्या घराजवळील शेतात रखवालीसाठी खाटेवर झोपले होते, तर बाजूच्या खाटेवर त्यांची पत्नी झोपली होती. दरम्यान, मध्यरात्री १२:३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, पुसू यांचा जागीच मृत्यू झाला. पुसू यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यावर इतर लोक धावले, त्यानंतर घटनेची माहिती नेलगुंडा पोलिसांना देण्यात आली. नेलगुंडा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

शेतीच्या वादाची किनार ?

पुसू हबका यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. मात्र, शेतीच्या वादातून त्यांना संपविण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे नेलगुंडा गावात शोककळा पसरली असून मृताच्या पश्चात पत्नी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Elderly man murdered in field; throat slit with weapon.

Web Summary : An elderly farmer, Pusu Habka, was brutally murdered in his field in Nelgunda, Gadchiroli. He was sleeping on a cot when unknown assailants slit his throat. Police suspect a land dispute as the motive. Investigation underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली