शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

वनविकास महामंडळ, महाबीज महामंडळ, वखार महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन महामंडळ या महामंडळांतील विविध संघटना एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगाच्या मागणीकरिता कृती समिती स्थापन केली आहे. समितीने राज्य शासनाला वारंवार निवेदन दिले आहे. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१६ पासून कामबंदचा इशारा, सातवा वेतन आयाेग लागू करा; पाेर्ला वन परिक्षेत्रातील कर्मचारी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी नफ्यात असलेल्या विविध महामंडळांतील कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवले आहे. महामंडळातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जात नसल्याने  वनविकास महामंडळाच्या पोरला परिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात  काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले.वनविकास महामंडळ, महाबीज महामंडळ, वखार महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन महामंडळ या महामंडळांतील विविध संघटना एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगाच्या मागणीकरिता कृती समिती स्थापन केली आहे. समितीने राज्य शासनाला वारंवार निवेदन दिले आहे. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करणे सुरू केले आहे. १५ जूनपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन व     १६ जूनपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.  त्यामुळे रोप लागवडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आंदोलनात  वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. यादव, वन परिमंडळ अधिकारी एस. बी. बोथे, यु. के. खडगी, वनरक्षक एन. के. चौधरी, जे. डी. मडावी, एन. सी. उईके, पी. व्ही. वाघमारे, ए. पी. सिडाम, डब्ल्यू. आर. हाडगे, आदी सहभागी झाले.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग7th Pay Commissionसातवा वेतन आयोग