शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बोरकर यांच्यावरील कारवाई अन्यायपूर्ण

By admin | Updated: May 11, 2017 01:53 IST

गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने बाळ दगावल्याच्या प्रकरणात प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले.

निलंबन मागे घेण्याची मागणी : बीआरएसपीचा आंदोलनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने बाळ दगावल्याच्या प्रकरणात प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले. दोषीला शिक्षा होणे सहाजीकच आहे. मात्र सदर प्रकरणात विनाकारण डॉ. उज्ज्वला बोरकर यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. डॉ. बोरकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रूजू आदेश द्यावे, अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे. बन्सोड यांनी म्हटले आहे की, अहेरी येथील गर्भवती महिला शमीम सुलतान शेख हिला २२ डिसेंबर २०१६ रोजी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांनी हेतुपुरस्सर गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे २५ डिसेंबरला प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्याचा आरोप मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने केला. चौकशीअंती डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले. दोषीला शिक्षा होणे साहजीकच आहे. मात्र डॉ. उज्ज्वला बोरकर यांना सदर प्रकरणात विनाकारण निलंबित करण्यात आले यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या पाठपुराव्यामुळे बाळ दगावल्याच्या प्रकरणाच्या बातम्या वृत्तपत्रात धडकल्या. मात्र कुठेही डॉ. उज्ज्वला बोरकर यांचा या प्रकरणासंदर्भात उल्लेख नव्हता. विभागीय चौकशी समितीच्या सदस्यांनी चौकशीदरम्यान डॉ. उज्ज्वला बोरकर यांना काहीच न विचारता चौकशी अहवालात वारंवार डॉ. उज्ज्वला बोरकर यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे आरोग्य सचिवालयाने डॉ. उज्ज्वला बोरकर यांनासुद्धा सहा महिन्यांसाठी निलंबित करून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे बन्सोड यांनी म्हटले आहे. डॉ. जामी मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बीआरएसपीने केली आहे. बाळ दगावले प्रकरणाची चौकशी विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली. या समितीच्या अहवालावरून शासनाने डॉ. प्रवीण किलनाके यांच्यासह डॉ. उज्ज्वला बोरकर यांना निलंबित केले. चौकशी व कारवाईबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कुठलाही संबंध नाही. - डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली