७९ कोरोनामुक्त, ५१ नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:17+5:30

जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या   ७ हजार ८६३ झाली आहे. त्यापैकी ७ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  ७३८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ७८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.३९ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला आहे.

79 coronal free, 51 newly infected | ७९ कोरोनामुक्त, ५१ नवीन बाधित

७९ कोरोनामुक्त, ५१ नवीन बाधित

  लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  तसेच ५१ नवीन बाधित आढळून आले.  
जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या   ७ हजार ८६३ झाली आहे. त्यापैकी ७ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  ७३८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ७८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.३९ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला आहे.
 गडचिरोली तालुक्यातील नवीन ३३ बाधितांमध्ये कारमेल हायस्कूलजवळ २, सर्वोदय वॉर्ड ५, इतर जिल्ह्यातील २ , स्नेहनगर २, रामपुरी वार्ड १, कनेरी ३, येवली १, रेड्डी गोडावून जवळ ३, माडिकल कॉलनी १, गोकूलनगर ३, नवेगाव १, , पोलीस केंद्र पोटेगाव १, अमिर्झा १ सुप्रभात मंगल कार्यालयाजवळ १ व कॅम्प एरिया १ जणाचा समावेश आहे.  आरमोरी मधील पेठ तुकूम २, चामोर्शी तालुक्यातील गुरनोली गावातील १ आहे. एटापल्ली तालुक्यातील झारावंडी येथील १,  कुरखेडा व सिरोंचा मधील प्रत्येकी १ स्थानिकांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील भगतसिंग वार्ड २, सीआरपीएफ कॅम्प ३ व सिंधी कॉलनीतील २ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही आता काेराेनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे शहराबराेबरच ग्रामीण भागातही धाेका वाढला आहे. याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. 

Web Title: 79 coronal free, 51 newly infected