शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६९६ घरांची पडझड

By admin | Updated: September 9, 2014 23:27 IST

१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर

सात जण दगावले : ३९ गोठ्यांची पडझड, १५ लाखांचे नुकसानगडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर पुरामुळे दोन अशा एकूण ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे ६६ जनावरेही दगावली आहेत. एकूणच पावसाच्या महाप्रलयामुळे घरांची पडझड व जनावरांची मिळून एकूण १५ लाख ११ हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात संततधार पावसाने जिल्हाभरात कहर केला. यामुळे भामरागड, सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. परिणामी या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहात झाली. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन जिल्ह्यात एकूण २४ जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे १ लाख १४ हजार ४५० रूपयाचे नुकसान झाले. याच महिन्यात जिल्ह्यात ७ गोठ्यांची पूर्णत: व १११ गोठ्यांची अंशत: असे एकूण ११८ गोठ्यांची तसेच घरांची पडझड झाली. यामुळे १ लाख २० हजार ४९० रूपयाचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकूण ३० जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे ११ लाख ६ हजार ९५० रूपयाचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात एकूण ३६२ घरांची तसेच गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ११ लाख ५७ हजार ६६० रूपयाचे नुकसान झाले. तसेच पुरात वाहून गेलेल्या दोघाजणांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक कुरखेडा तालुक्यात १०८ घरांची पडझड झाली. तर त्या खालोखाल मुलचेरा तालुक्यात ८८ घरांची पडझड झाली. कोरची तालुक्यात ४७ घरांची पडझड झाली. अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन ११ जण जखमी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे गडचिरोली तालुक्यात ९ गावातील ४० घरांची अंशत: पडझड झाली. धानोरा तालुक्यातील २५ गावातील ४३ घरांची अंशत: पडझड झाली. देसाईगंज तालुक्यात ६, आरमोरी तालुक्यात ३६, चामोर्शी तालुक्यात १९४, अहेरी तालुक्यात ३३, भामरागड तालुक्यात १ घराची अंशत: पडझड झाली. अतिवृष्टीमुळे पूर्णत: घरांची पडझड झालेल्यांमध्ये धानोरा तालुक्यातील ७, देसाईगंज तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील २७ घरांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरमालक तसेच जनावर मालकांना आणि मृतकांच्या कुटुंबीयांना व जखमी झालेल्या इसमांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तालुका व गावपातळीवरील सर्व महसूल कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने त्या-त्या तालुक्यातील व गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी अतिवृष्टीमुळे नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहेत. सदर नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाला पाठविण्याची कारवाई सुरू आहे.अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविले जाते. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)