शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: January 13, 2016 01:51 IST

महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत गौण ....

गडचिरोली उपविभाग अव्वल : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूकगडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीचे एकूण ४९० प्रकरणे निकाली काढून २८ लाख ६ हजार ५३० रूपयांचा दंड वसूल केला आहे. अवैधरित्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक कारवाईत गडचिरोली उपविभाग अव्वल ठरला आहे. या विभागाने वर्षभरात सर्वाधिक २०३ प्रकरणे निकाली काढून ९ लाख ५७ हजार २३० रूपयांचा दंड वसूल केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौणखनिज आहेत. रेती, मुरूम व इतर गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतूक करण्यासंदर्भात पर्यावरण व शासनाचे नियम आहेत. याच नियमानुसार दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने रेती घाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र कमी वेळात अधिकाधिक पैसा कमविण्यासाठी अनेक रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक करतात. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक धाडसत्र राबवून कारवाई करतात. गडचिरोली उपविभागातील धानोरा तालुक्यात महसूल विभागाने वर्षभराच्या काावधीत अवैध उत्खननाचे एकूण १९ प्रकरणे निकाली काढली. यात संबंधित तस्करांकडून १ लाख ५१ हजार ४८० रूपयांचा दंड वसूल केला. तर गडचिरोली तालुक्याच्या महसूल विभागाने वर्षभरात १८४ प्रकरणे निकाली काढून एकूण ८ लाख ५ हजार ७५० रूपयांचा दंड वसूल केला. गडचिरोली उपविभागाने वर्षभरात एकूण २०३ प्रकरणे निकाली काढून ९ लाख ५७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तालुका महसूल प्रशासनाने वर्षभरात एकूण ४० प्रकरणे निकाली काढून ३ लाख २१ हजार २०० तर मुलचेरा तालुका महसूल प्रशासनाने केवळ सहा प्रकरणे निकाली काढून २८ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी उपविभागाने ४६ प्रकरणातून एकूण ३ लाख ४९ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज तालुका प्रशासनाने ५८ प्रकरणे निकाली काढून एकूण २ लाख ७६ हजार ८२० रूपयांचा तर आरमोरी तालुका महसूल विभागाने ३८ प्रकरणे निकाली काढून एकूण १ लाख ८९ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज उपविभागाने वर्षभरात ९६ प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ६६ हजार ५२० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा तालुका महसूल विभागाने ५४ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ६८ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. कोरची तालुका महसूल विभागाने केवळ सात प्रकरणे निकाली काढून १ लाख १२ हजार ९४० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा उपविभागाने ६१ प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ८१ हजार ३४० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी तालुका महसूल विभागाने ४२ प्रकरणे निकाली काढून २ लाख ९९ हजार २०० तर सिरोंचा महसूल विभागाने २८ प्रकरणे निकाली काढून १ लाख ८५ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने ७० प्रकरणे निकाली काढून एकूण ४ लाख ८४ हजार ८४० रूपयांचा दंड वसूल केला.