शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

कारसह २५ पेट्या दारू जप्त

By admin | Updated: July 23, 2014 00:00 IST

तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे. घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती

चामोर्शी : तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे. घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती चामोर्शी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार चामोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष गिरीगोसवी यांच्या मार्गदर्शनात कर्कापल्ली फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान नोंदणी क्रमांक नसलेली पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने घोटकडून आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनधारकाने पोलिसांना न जुमानताच वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता, गौरीपूर गावाजवळील जंगलामध्ये दारूने भरलेली कार सोडून तिचा चालक व साथीदार जंगलाच्या मार्गाने पसार झाले.सदर कारची चौकशी केली असता कारमध्ये २५ पेट्या दारू आढळून आली. दारूसह वाहन चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. या घटनेचा मुख्यसूत्रधार, अवैध दारू पुरवठादार, चालक, किरकोळ विक्रेते यांचा शोध चामोर्शी पोलीस घेत आहेत. सदर कारवाई चामोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अलोणे, सुधीर गुळकर, सतीश कत्तीवार, कुमुद भानारकर, चालक नितीन पाल यांनी केली.चामोर्शी तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, सावली, मूल तालुक्याच्या सीमा लागून आहेत. सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात देशीदारू व बीअरबारची दुकाने आहेत. ही दुकाने चामोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या भरवशावरच चालतात. हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यातही या दारू दुकानातून अवैध दारूचा पुरवठा केला जातो. यातून दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (तालुका प्रतिनिधी)