कुरखेडा येथे २१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:42+5:302021-02-11T04:38:42+5:30

कुरखेडा : येथील सिंधू भवनात शिवसेना पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण ...

21 people donated blood at Kurkheda | कुरखेडा येथे २१ जणांनी केले रक्तदान

कुरखेडा येथे २१ जणांनी केले रक्तदान

कुरखेडा : येथील सिंधू भवनात शिवसेना पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण २१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जाेपासली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार माेहबंसी, आशिष काळे, विजय पुस्तोडे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, राहुल घोगरे, प्रणय भजणे, नरेंद्र तिरणकर, नगरसेविका अनिता बोरकर, शारदा गाथाडे, जयेंद्र चंदेल, सुधाकर भेंडे, के.आर. पंधरे, रशिद शेख, आशिष चुधरी, राकेश सहारे, रोहित निपाने, लितेश उईके, नितेश देशमुख, देवेंद्र मेश्राम, आकाश मेश्राम व शिवसैनिक उपस्थित होते. शिबिरात आशिष काळे, शुभम कोनप्रतिवार, राकेश सहारे, दुर्गेश मेश्राम, गौरव तडस, मानिक बुरबांधे, खेमराज बावनकर, नरेंद्र वरवाडे, हर्षल भानारकर, चिराग चव्हाण, दुर्गेश देशमुख, गोलू धांडे, के.एम. मडावी, आकाश मेश्राम आदी २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याशिवाय शिवसेनेच्या वतीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

Web Title: 21 people donated blood at Kurkheda