जिल्हा परिषदेतर्फे १६० जोडप्यांना सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:57+5:30

या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन या योजनेच्या अर्थसहाय्य रकमेत वाढ केली. जि.प.च्या समाजकल्याण कार्यालयात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे एकूण २४५ प्रस्ताव प्राप्त झाले.

160 couples honored by Zilla Parishad | जिल्हा परिषदेतर्फे १६० जोडप्यांना सन्मान

जिल्हा परिषदेतर्फे १६० जोडप्यांना सन्मान

Next
ठळक मुद्दे७९.८५ लाखांचे धनादेश वाटप : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जिल्ह्यातील जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जि.प.च्या सभागृहात बुधवारी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष अजय कंकडालवार होते.
प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रमेश बारसागडे, जि.प.सदस्य गीता कुमरे, लता पुंगाटी, समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.
१२ जानेवारी १९९६ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील जातीयता व भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन या योजनेच्या अर्थसहाय्य रकमेत वाढ केली. जि.प.च्या समाजकल्याण कार्यालयात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे एकूण २४५ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १६० प्रस्ताव निकाली काढून प्राप्त निधीनुसार ७९.८५ लक्ष रुपये अर्थसहाय्य वाटपावर खर्च करण्यात आले आहे. जि.प.समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ६० पेक्षा अधिक जोडपे प्रत्यक्ष हजर होते.
प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण, संचालन पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी तर आभार निरीक्षक अमोल श्रीमनवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नीलेश तोरे, रामेश्वर दरडे, प्रमोद ढगे, भास्कर दोनाडकर, महेश नाईक यांनी सहकार्य केले.

भेदभाव कमी करण्यास मदत- कंकडालवार
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. ते यावर्षी निकाली काढण्यात आले. या योजनेमुळे जाती-जातींतील भेदभाव कमी होण्यास मदत होत आहे. मानवतेची भावना वृद्धींगत होत आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

Web Title: 160 couples honored by Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.