बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: July 25, 2015 01:53 IST2015-07-25T01:53:41+5:302015-07-25T01:53:41+5:30

घराच्या मागील भागात असलेल्या सांदवाडीमध्ये मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी १० वर्षांची शिक्षा व ५०० रूपयांचा दंड ठोठावला.

10 years of education for rapists | बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा

बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा

निर्णय : मतिमंद मुलीवर झाला होता अत्याचार
गडचिरोली : घराच्या मागील भागात असलेल्या सांदवाडीमध्ये मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी १० वर्षांची शिक्षा व ५०० रूपयांचा दंड ठोठावला. राजू कस्तुरे (२६) रा. सोमनपल्ली ता. चामोर्शी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची हकीकत अशी आहे की, ३० सप्टेंबर २०१३ रोजी मुलीचे वडील सांदवाडीमागील शेतात पिकाचे राखण करीत होते. दरम्यान सांदवाडीमध्ये बोलण्याचा आवाज ऐकून पीडित मुलीचे वडील सांदवाडीमध्ये येऊन बघीतले. दरम्यान आरोपी राजू कस्तुरे हा पीडित मुलीवर बलात्कार करीत असल्याचे निदर्शनास आले. वडिलांनी त्याच ठिकाणी आरोपीला पकडले व या घटनेसंदर्भात चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास चामोर्शीचे पोलीस उपनिरीक्षक डी. एच. मेश्राम यांनी करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी न्यायालयाने सर्व साक्षीदार व पुराव्याची पडताळणी करून आरोपी राजू कस्तुरे याला १० वर्षांची शिक्षा व ५०० रूपयांचा दंड ठोठावला. तसेच पीडित मुलीच्या पुनर्वसनाकरिता नुकसानभरपाई म्हणून सदर पीडित मुलीला राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 10 years of education for rapists