शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

भारतात वाढतेय ‘फूड टूरिझम’ची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 13:54 IST

६३ टक्के भारतीय पर्यटक पुढील वर्षी केवळ विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटणाला जाणार आहेत.

भारतीय लोक खाण्याचे शौकिन म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. बाहेर फिरायला जरी जायचे झाले तर कुठे कसे जेवण मिळते यावरूनच ‘ट्रिप’ प्लॅन केली जाते. एका आॅनलाईन ट्रॅव्हल पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणातून देसी ‘ट्रॅव्हलर्स’ची ‘फूडी’ म्हणून ओळख समोर आली आहे.सर्व्हेनुसार ६३ टक्के भारतीय पर्यटक पुढील वर्षी केवळ विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटणाला जाणार आहेत. म्हणजे आपली ‘खवय्येगिरी’ची भूक शमवण्यासाठी भारतीय पर्यटक घराबाहेर पडणार आहेत. ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे खाण्यासाठी काय प्रसिद्ध आहे यावरून ५१ टक्के भारतीय पर्यकट तेथे जायचे की नाही हे ठरवतात.हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जाण्याचे प्रमाण देशामध्ये वाढत असून जागतिक दर्जाचे ‘फूड कल्चर’ विकसित होत आहे. बाहेर जेवताना भारतीय स्वदेशी डिशेसला सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यानंतर इटालियन खाद्यपदार्थांचा क्रमांक लागतो. सुमारे ३४ टक्के लोक महिन्यातून एक-दोन वेळेस तर ३३ टक्के  लोक आठवड्यातून एकदा बाहेर जेवण करतात.हॉटेल्सची वाढती संख्या आणि खाण्याविषयीचे निस्सिम प्रेम या गोष्टींमुळे भारतात फूड ट्रव्हेलिंगची क्रेझ पसरत आहे. सर्व्हेमध्ये ६७ लोकांनी एका निश्चित रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा बेत आखत असल्याचे सांगितले. ३५ टक्के लोकांनी सेलिब्रेटी शेफसाठी एखाद्या हॉटेलला भेट दिल्याचे मान्य केले. रेस्टॉरंटची निवड करताना ५७ टक्के लोक आॅनलाईन रिव्ह्युवझ् तपासून पाहतात. मग तुमचा काय प्लॅन आहे? राजस्थानी थाली की, गुजराती ढोकळ की, बंगालचा रसगुल्ला की, हैदराबादची बिर्याणी? आम्हाला सांगा ‘सीएनएक्समस्ती’च्या संकेतस्थळावर.