Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:56 IST2026-05-08T12:53:38+5:302026-05-08T12:56:57+5:30

10th Pass Courses: दहावीचा निकाल लागला की सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे करिअरची निवड! अनेकदा आपण मित्रांच्या मागे जातो किंवा पालकांच्या दबावाखाली निर्णय घेतो. पण लक्षात ठेवा, एक निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो!

Maharashtra SSC Result 2026 Released: What to Do After Class 10? Check the Best Career Options in Science, Commerce Arts or other courses for students | Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!

Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर पुढील शिक्षणाचा आणि करिअरचा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. विद्यार्थ्याच्या आयुष्यातील हा टप्पा अत्यंत निर्णायक मानला जातो. कारण याच काळात घेतलेला योग्य निर्णय विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना केवळ स्वतःची आवड, कौशल्य, क्षमता आणि भविष्यातील ध्येय यांचा विचार करणे आवश्यक आहे. विज्ञान, वाणिज्य, कला, आयटीआय, पॉलिटेक्निक, व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये दहावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांपेक्षा आवडीला अधिक महत्त्व देऊन करिअरची दिशा निश्चित करावी. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक आणि करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतल्यास योग्य क्षेत्राची निवड करणे सोपे होईल.

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा, अशा तीन शाखा उपलब्ध असतात. त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. 

विज्ञान शाखा: ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, आयटी क्षेत्र किंवा संशोधनात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी विज्ञान शाखा हा उत्तम पर्याय आहे.

वाणिज्य शाखा: बँकिंग, फायनान्स, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा व्यवस्थापन क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेची निवड करावी.

कला शाखा: जर तुम्हाला अभिनय, संगीत, नृत्य आणि पत्रकारितेची आवड असेल, तर कला शाखा तुमच्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देते.

Maharashtra SSC Result 2026: दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहायचा? 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा

इतर पर्याय

इंजिनिअरिंग डिप्लोमा

ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तांत्रिक शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी ३ वर्षांचा डिप्लोमा हा एक उत्तम मार्ग आहे. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळवणे सोपे जाते.

स्पर्धा परीक्षांची तयारी 

दहावीनंतर अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात. काही स्पर्धा परीक्षांसाठी किमान पात्रता दहावी असते. रेल्वे तिकीट कलेक्टर , बँक इन्शुरन्स क्लर्क यांसारख्या काही पदांसाठी  तयारी आतापासूनच सुरू करता येते. मात्र, एमपीएससी किंवा यूपीएससीसारख्या मोठ्या परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे, तरीही त्याचा पाया दहावीनंतर रचला जाऊ शकतो.

Web Title : 10वीं के बाद करियर विकल्प: आपके भविष्य के लिए सर्वश्रेष्ठ विकल्प!

Web Summary : 10वीं के बाद, छात्रों के सामने करियर के महत्वपूर्ण विकल्प होते हैं। रुचियों, कौशल और भविष्य के लक्ष्यों पर विचार करें। विकल्पों में विज्ञान, वाणिज्य, कला, आईटीआई और पॉलिटेक्निक शामिल हैं। विशेषज्ञ करियर दिशा के लिए अंकों से ऊपर जुनून को प्राथमिकता देने की सलाह देते हैं। सूचित निर्णय लेने के लिए अवसरों का अन्वेषण करें।

Web Title : Career Options After 10th: Best Choices for Your Future!

Web Summary : After 10th grade, students face crucial career choices. Consider interests, skills, and future goals. Options include science, commerce, arts, ITI, and polytechnic. Experts advise prioritizing passion over marks for career direction. Explore opportunities for informed decisions.