Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:29 IST2026-05-08T09:29:01+5:302026-05-08T09:29:34+5:30

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त तुम्ही उमंग ॲप आणि डिजीलॉकरद्वारे तुमचा एसएससी निकाल ऑनलाइन तपासू शकता

Maharashtra SSC Result 2026: How and where to check 10th class result today?; Follow this simple trick | Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा

Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. ८ मे रोजी म्हणजे आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in यावर जावे लागेल. SSC चा निकाल पाहण्यासाठी सीट नंबर, रोल नंबर, आईचे नाव यावरून चेक करता येऊ शकते. परंतु तुम्हाला सोपा अन् सुलभ पद्धतीने निकाल पाहण्याची ट्रिक समजायला हवी.

तुमचा महाराष्ट्र SSC बोर्ड इयत्ता १०वीचा निकाल तपासण्यासाठी, तुम्हाला या तीन तपशिलांची आवश्यकता असेल. तुमचा रोल नंबर, सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव. जर तुम्हाला आईचे नाव सोडून इतर दोन तपशील माहिती नसतील किंवा सीट नंबर, रोल नंबर लक्षात नसेल तर फटाफट तुमचे हॉल तिकिट शोधून ठेवा, कारण यावर तुम्हाला सगळे तपशील सापडतील. 

How to check Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र दहावीचा निकाल कसा तपासावा?

महाराष्ट्र SSC बोर्ड १०वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही खालील दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे तुमचा निकाल तपासू शकता

सर्वप्रथम mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

विंडो उघडल्यावर 'Maharashtra Board SSC Result 2026' या लिंकवर क्लिक करा.

आता तुमचा रोल नंबर किंवा सीट नंबर आणि तुमच्या आईच्या नावाचे पहिले अक्षर टाका.

जर तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या आईचे नाव नमूद केलेले नसेल तर त्याऐवजी XXX भरा आणि सबमिट करा.

निकालपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही आता ते PDF म्हणून सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त तुम्ही उमंग ॲप आणि डिजीलॉकरद्वारे तुमचा एसएससी निकाल ऑनलाइन तपासू शकता. Digilocker वर तुमचा महाराष्ट्र SSC निकाल कसा तपासायचा ते जाणून घ्या

सर्वात आधी Maharashtra Board SSC Digilocker वेबसाइट www.digilocker.gov.in ला भेट द्या.

तुमचा मोबाइल नंबर किंवा आधार नंबर वापरून साइन इन करा. तुमचे खाते व्हेरिफाई केले जाईल.

यानंतर 'Issued Documents' या पर्यायावर क्लिक करा आणि Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education हे निवडा  

पुढील स्टेपमध्ये 'SSC Marksheet/ Class 10th Marksheet 2026' वर क्लिक करा आणि तुमचा रोल नंबर/सीट नंबर/वर्षाचा तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

निकाल गुणपत्रिका तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमची गुणपत्रिका पीडीएफ (PDF) किंवा प्रिंटआउट घेऊन जतन करू शकता.

Web Title : महाराष्ट्र एसएससी परिणाम 2026: 10वीं का परिणाम जांचने के आसान तरीके।

Web Summary : महाराष्ट्र एसएससी 2026 के परिणाम आज, 8 मई को दोपहर 1 बजे घोषित किए जाएंगे। छात्र mahresult.nic.in या mahahsscboard.in पर अपना सीट नंबर, रोल नंबर और मां का नाम डालकर परिणाम देख सकते हैं। परिणाम डिजिलॉकर और उमंग ऐप के माध्यम से भी उपलब्ध हैं। अपना हॉल टिकट तुरंत ढूंढें!

Web Title : Maharashtra SSC Result 2026: Easy ways to check your 10th result.

Web Summary : Maharashtra SSC 2026 results will be out today, May 8th, at 1 PM. Students can check their results on mahresult.nic.in or mahahsscboard.in using their seat number, roll number, and mother's name. Results are also available via Digilocker and the Umang app. Find your hall ticket quickly!