शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

‘पहिली’ आवश्यक; मग ‘दुसरी’ कशाला? बोर्ड परीक्षा आता देणार सुधारणेची दुसरी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:18 IST

वर्षातून दोन बोर्ड परीक्षा हे ताणमुक्त, लवचिक आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणव्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार, गुण सुधारण्याची संधी, क्रीडा विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद आणि पारदर्शक निकाल प्रक्रिया या सर्व बाबी लक्षात घेतल्यास ही योजना परिवर्तनकारी ठरू शकते. 

सुदाम कुंभार
समुपदेशक

देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवून आणणारा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका शैक्षणिक वर्षात दोन बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच आता सुरू असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा असेल आणि नंतर येत्या मे महिन्यात दुसरी परीक्षा होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनात मोलाचे परिवर्तन घडवणारा आहे.

हा निर्णय ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मधील तरतुदींशी सुसंगत आहे. शिक्षण धोरणात असे स्पष्ट नमूद केले आहे की, बोर्ड परीक्षा ‘हाय-स्टेक’ स्वरूपाच्या राहू नयेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकच परीक्षा त्यांच्या संपूर्ण भवितव्याचा निर्णय घेणारी ठरू नये. त्यामुळे एका शैक्षणिक वर्षात दोन प्रयत्नांची संधी द्यावी. एक मुख्य परीक्षा आणि दुसरी सुधारणा म्हणून. तसेच ‘बेस्ट ऑफ टू अटेम्पट्स’ या तत्त्वानुसार दोन प्रयत्नांतील सर्वोत्तम निकाल ग्राह्य धरण्याची भूमिका या धोरणात आहे.

पारंपरिक पद्धतीत एकाच अंतिम परीक्षेवर संपूर्ण निकाल अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करीत असले तरी शेवटच्या काही दिवसांतील तणाव, प्रकृतीतील चढ-उतार किंवा वैयक्तिक अडचणी यांचा परिणाम अंतिम निकालावर होतो. अपेक्षित यश न मिळाल्यास आत्मविश्वास डळमळीत होतो.  नव्या पद्धतीमुळे पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण न मिळाल्यास दुसऱ्या परीक्षेद्वारे सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अपयशाची भीती कमी होईल. विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेनंतर स्वतःच्या कमकुवत विषयांची जाणीव होईल. दुसऱ्या प्रयत्नात सुधारित कामगिरी करता येईल. ही प्रक्रिया गुण सुधारण्यापुरती मर्यादित नसून समज, विश्लेषण क्षमता व आत्मविश्वास वाढवणारी ठरेल, असे धोरणकर्त्यांना वाटते. यामुळे शिकण्याकडे केवळ निकालाच्या दृष्टीने बघणे कमी होईल.

नव्या धोरणाचा अर्थ कुणासाठी काय?

मानसिक ताण कमी : पालकांच्या दृष्टीने हा निर्णय मोठा दिलासादायक म्हणावा लागेल. एकदाच होणाऱ्या परीक्षेच्या निकालावर संपूर्ण भविष्य अवलंबून राहणार नसल्याने मानसिक ताण कमी होईल. मुलांच्या प्रगतीसाठी अतिरिक्त वेळ आणि संधी उपलब्ध असतील. तसेच तातडीच्या कोचिंगचा दबाव किंवा अनावश्यक स्पर्धात्मक वातावरण कमी होण्याची अपेक्षा आहे.

आधी स्पर्धा, मग पेपर : क्रीडा क्षेत्रात निपुण विद्यार्थ्यांसाठी ही योजना विशेष उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा बोर्ड परीक्षांशी जुळल्यास दुसऱ्या परीक्षेला बसण्याची संधी त्यांना मिळेल. त्यामुळे शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल राखणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल आहे.

शाळांची जबाबदारी महत्त्वाची : या प्रक्रियेत पालक आणि विद्यार्थ्यांना धोरणाची स्पष्ट व सविस्तर माहिती देणे, अर्ज प्रक्रियेत अचूकता राखणे, विषय निवडीत मार्गदर्शन करणे आणि सुधारणा परीक्षेसाठी विशेष अध्यापनाची व्यवस्था करणे शाळांना आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कमतरता ओळखून पूरक अध्यापन करणे हीदेखील शाळांची जबाबदारी ठरेल.

पहिली परीक्षा अनिवार्य : विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा गांभीर्याने देणे अनिवार्य आहे. दुसऱ्या परीक्षेला केवळ आवश्यक असल्यासच प्रवेश घ्यावा. गुण सुधारण्यासाठी योग्य विषयांची निवड, कागदपत्रांची अचूक पूर्तता आणि शाळेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणेही तेवढेच गरजेचे असेल. ही संधी केवळ ‘दुसरी संधी’ म्हणून न पाहता, स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची प्रक्रिया म्हणून स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : First Exam Essential, Why a Second? Board Exam Offers Improvement Chance!

Web Summary : CBSE's two-exam system from 2025-26 offers students a chance to improve scores. This aligns with the National Education Policy 2020, reducing exam pressure. Schools must support students, guiding them through the process. The first exam is compulsory.
टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी