शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

एलएलबी प्रवेशासाठी झुंबड, विक्रमी ५१,३३४ अर्ज; यंदा कट ऑफ अधिक राहण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:30 IST

एलएलबीच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी ५१,३३४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळेल, असे चित्र आहे. एलएलबीच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवाशासाठी मोठी चुरस असणार आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सीईटी सेलने एलएलबीच्या कॅप फेरीसाठी अर्ज भरण्यास ३० जूनला सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी संपली. यंदा एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी ५७,८९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१,३३४ विद्यार्थ्यांनी सर्व माहिती भरून अर्ज अंतिम केला आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.कायद्याच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढागेल्या काही वर्षांत एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरी अथवा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एलएलबीचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे. त्यातून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवेशासाठी चुरसही वाढली आहे.

प्रवेशासाठी यंदा चुरसगेल्यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१,०७१ जागा उपलब्ध होत्या. त्यावेळी २०,३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यातून बहुसंख्य कॉलेजांतील जागा भरल्या गेल्या होत्या. यंदाही एलएलबीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रवेशासाठी चुरस असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी