शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, 2026 पासून नवीन धोरण लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 22:04 IST

CBSE Board Exam : परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल.

CBSE Board Exam : देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देतात. यातील काही विद्यार्थी पास होतात, तर काही नापास होतात. अशा नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. पण, आता 2026 पासून हा पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही. सीबीएसई बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने मंगळवारी त्याच्या मसुद्याला अंतिम मंजुरीही दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा लगेच मे महिन्यात घेतला जाईल. म्हणजेच, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. CBSE नुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. पण, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन एकदाच घेण्यात येईल. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच केंद्र देण्यात येणार आहे. पण, यासाठी विद्यार्थ्यांना जास्त परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा मिळणार?शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार असेल. जर विद्यार्थी दोनदा परीक्षेला बसले, तर त्यांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल. सध्या सीबीएसईने तयार केलेल्या मसुद्यानुसार, पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे या कालावधीत होणार आहे.

शिक्षण पद्धतीत मोठा बदलसीबीएसईच्या या मसुद्याबाबत शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या मसुद्यावर चर्चा झाली. यापूर्वी 19 फेब्रुवारीलाही मंत्रालयात बैठक झाली होती. यामध्ये CBSE, NCERT, KV मध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या वेबसाइटवर शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सामान्य लोक यांच्याकडून धोरणाच्या मसुद्यावर अभिप्राय घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. हा मसुदा सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. सीबीएसईच्या या मसुद्यावर 9 मार्चपर्यंत लोक आपले मत देऊ शकतात.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षणexamपरीक्षा