शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

By मेघना ढोके | Updated: June 22, 2025 08:56 IST

Nashik Kumbh Mela 2027: बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभात ‘गंगा न्हायचं’ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी माणसं लांबलांबून येतात. नाशिकच्या सिंहस्थात तर उत्तरेतली गर्दी असते तशी दक्षिणेतलीही.

-मेघना ढोके (संपादक, लोकमत सखी डिजिटल)

३१ ऑक्टोबर २०२६. म्हणजे जेमतेम वर्षभरानं नाशिक कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल! आणि सुरू होईल नाशकातला सिंहस्थ! 

अन्यत्र कुंभमेळाच म्हणत असले तरी नाशकात असतो तो सिंहस्थच. तर असा हा दर १२ वर्षांनी नाशकात भरणारा कुंभमेळा. मात्र कुंभमेळा फक्त सांधूचाच असतो का? तर नाही. साधू समाजासह तो संसारी समाजाचा म्हणजे साधू नसलेल्या माणसांचाही असतो. साधू समाजाचे लाडकोड खूप होतात. 

प्रशासन त्यांचा एकेक शब्द तळहातावर झेलतो हे सारं काही नवीन नाही. भारतभर भरणाऱ्या प्रत्येक कुंभात आणि अर्धकुंभात हे सारे मानापमान, रुसवेफुगवे, शाहीसोहळे नेमानं पार पडतात. शाही पर्वण्यांच्या दिवशी साधूंच्या मिरवणुका निघतात आणि त्यांचा पारंपरिक मान आणि ताम्रपटानुसार स्नानाचे क्रम ठरतात.

त्या गर्दीत काही ‘फक्कडभाई’ साधू असतात. म्हणजे केवळ भगवी कफनी घालून निवांत पोट भरायला गर्दी करणारे, ते ना कुठल्या आखाड्याचे असतात ना कोणत्या खालसाचे असतात. ते केवळ जेवणापुरते एक जागा पकडून राहतात. काही असतात हठयोगी साधू. जे आपल्या चमत्कारिक कृतींनी माध्यमांसह गर्दीचं लक्ष वेधून घेतात. त्यांचे फोटो छापून येतात ती कात्रणं गोळा करुन ते पुढच्या कुंभाच्या वाटेनं जातात. लोकेशणा-अर्थात त्या कौतुकाचं अप्रूप कितीही हठ केले तरी मनाची मोहवाट सुटत नाहीच.

बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभात ‘गंगा न्हायचं’ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी माणसं लांबलांबून येतात. नाशिकच्या सिंहस्थात तर उत्तरेतली गर्दी असते तशी दक्षिणेतलीही. काही खालसांतून अत्यंत गोरगरीब माणसं लांब लांबून आलेली असतात. 

गावखेड्यातली माणसं विविध खालसांच्या टेम्पोतून, बसमधून कुंभात येतात. खालसा म्हणजे साधूंच्या आखाड्यांशी संंबंधित विविध ठिकाणच्या शाखा. त्याच खालसांच्या अन्नछत्रात पंगती धरून गरीब माणसं जेवतात आणि जागा मिळेल तिथे पथारी लावतात. या गर्दीला म्हणतात ‘खालसावाली भीड’! 

त्या गर्दीला चेहरा नसतो, ना तिथे कुणी कुणाला जातपात विचारतो. मात्र, नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याचं चित्र पाहता, नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्याचं हे पारंपरिक रूप येत्या सिंहस्थात बदलणार हे उघड आहे.

कुंभमेळ्याचा ‘फोमो’ होणारी नवी रिलवाली -मोबाइलस्नेही गर्दी आगामी सिंहस्थात नक्की दिसेल! या गर्दीचा आर्थिक स्तर वेगळा असेल आणि त्यामुळे त्यांच्यासाठीच्या विकत-मोफत सुविधाही वेगळ्याच असतील. या गर्दीचं नियोजन हा येत्या कुंभातला सगळ्यात अवघड प्रश्न आहे.

नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा

ध्वजारोहण : ३१ ऑक्टोबर २०२६

पहिले शाही स्नान : २ ऑगस्ट २०२७

दुसरे शाही स्नान : ३१ ऑगस्ट २०२७

तिसरे शाही स्नान : ११ सप्टेंबर २०२७ (नाशिक), १२ सप्टेंबर २०२७(त्र्यंबकेश्वर)

समाप्ती : २४ जुलै २०२८

कुंभमेळा २८ महिने

एरव्ही १३ महिनेच चालणारा सिंहस्थ पर्वकाळ येत्या कुंभात मात्र २८ महिन्यांचा आहे. तीन पर्वण्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण ४४, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ५३ मुहूर्त. या प्रत्येक मुहूर्ताला गंगास्नानासाठी गर्दी होण्याची शक्यता.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळेSocial Mediaसोशल मीडिया