शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

Dwarkanath Sanzgiri: ओघवत्या शैलीचा समीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 06:01 IST

Dwarkanath Sanzgiri cricket: द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा.

-संजीव साबडे, मुक्त पत्रकार लोकप्रिय क्रीडा लेखक आणि हिंदी चित्रपट व संगीताचे कार्यक्रम करणारा द्वारकानाथ संझगिरी पूर्वी महापालिकेत इंजिनिअर होता; पण क्रिकेट आणि संगीताची आवड त्याला तरुणपणी गप्प बसू देत नव्हती. त्यातून त्याने १९७९ मध्ये क्रिकेटवरील पहिला लेख लिहिला दिनांक साप्ताहिकात. त्याची ओघवती शैली, अफाट माहिती, जुन्या आठवणी व किस्से असा सर्व मसाला असलेल्या त्या लेखाने संझगिरी लगेच लोकप्रिय झाला आणि नियमित लिहू लागला. त्याच्या तलत महमूदवरील ‘है सबसे मधुर वो गीत’ या लेखाचीही खूप चर्चा झाली आणि याच लिखाणाने संझगिरीचा पत्रकार व लेखक असा प्रवास सुरू झाला. 

द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा. वेळ मिळेल तेव्हा चित्रपट पाहणं हा त्याचा छंद. त्याच्या आवडी आणि छंदांद्वारे लिखाण करून त्यानं लाखो वाचकांना मुग्ध केलं. 

त्याने जवळपास १०-१२ विश्वचषक मालिकांना हजेरी लावली. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात तो गेला. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील आणि अनेक देशांचे खेळाडू त्याचे मित्र बनले होते. एकदा त्याने श्रीलंकेच्या खेळाडूंना पार्टीही  दिली होती. 

असंख्य सामने पाहिल्याने व खेळाडूच मित्र झाल्याने त्याच्याकडे माहिती, आठवणी आणि किस्से यांचा खजिनाच होता. त्या पेटाऱ्यातून कधी काय काढायचे हे त्याला माहीत असे. त्यामुळे त्याने क्रिकेट आणि खेळाडू यांच्याविषयी अनेक कार्यक्रमही केले. 

सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्यक्रमाला ३००० खुर्च्या असलेला ‘षणमुखानंद हॉल’ फुल होता. ती गर्दी सचिन आणि पप्पू या दोघांसाठी होती. 

पप्पूने क्रिकेट व संगीत यावर ५०० हून अधिक कार्यक्रम केले. संगीतकार रोशन, एस. डी. बर्मन,  सी. रामचंद्र, तसंच मुकेश, रफी, तलत हे गायक आणि देव आनंद, शम्मी कपूर, मधुबाला ते माधुरी अशा त्याच्या संगीताच्या कार्यक्रमांनाही अफाट गर्दी व्हायची. त्याचे परदेशांतही  कार्यक्रम होत. ‘लोकमत’पासून मराठीतील सर्व दैनिकांच्या पानांवर त्याचा वावर असे.

इतकी लोकप्रियता मिळूनही पप्पू वागण्यात साधाच होता. मित्रांमध्ये राहणं त्याला आवडायचं. काही वर्षांपूर्वी त्याची ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याने थोडी धावपळ कमी केली; पण कार्यक्रम व पुस्तक लेखन सुरूच ठेवलं. त्याची ४२ पुस्तके प्रकाशित होऊन संपली आहेत. 

त्याला दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी कर्करोग झाला. उपचार सुरू होते आणि लिखाण व कार्यक्रमही. त्रास वाढत गेल्याने तो कार्यक्रमात कमी बोलायचा वा स्वतः निवेदन करायचा नाही. त्याच्या घरीही जाणं व्हायचं. आजारपणात मात्र जाऊ शकलो नाही, ही खंत मनात कायम राहील.

टॅग्स :MumbaiमुंबईDeathमृत्यू